मुंबई : येथील लालबाग वन अविघ्न पार्क येथील इमारतीला आग लागली होती. त्यात एक सुरक्षारक्षक जीव वाचवण्यासाठी माळ्याला लटकून हात सुटल्याने १९ व्या मजल्यावरुन पडून मृत झाला आहे. याप्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेला सोसायटीची व्यवस्थापन समिती जबाबदार असून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लालबागमधील ही हायप्रोफाईल सोसायटी आहे. आग लागली तेव्हा या सोसायटीची पाण्याची यंत्रणा सुरु नव्हती, याबाबत सोसायटीच्या सदस्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सोसायटीच्या व्यवस्थापनावर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर फर्निचरचे काम सुरु होते. यावेळी ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही या ईमारतीमध्ये दोन जण अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या २० गाड्या व जवान प्रयत्न करत आहेत. दरम्यान ही आग भिषण असून ईमारतीमध्ये मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे. त्यामुळे बचावकार्याला अडचणी येत आहेत. अशी माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- ‘डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील दुवा म्हणून ‘हेल्दी सोसायटी’चे कार्य’, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा उत्साहात
- भारतीय संघाला टी-20 विश्वचषक जिंकण्याची जास्त संधी का?, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण


