🕒 1 min read
मुंबई : कोरोना नंतर ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सुविधा मिळण्यासाठी बँकांकडून अनेक नवनवीन योजना आणण्यात आल्या तर ऑनलाईन बँकिंग वापराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ग्राहकांसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ही सेवा सुरू केली आहे.
या सेवेमध्ये बँकेच्या कर्जदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँक शाखेमध्ये जाण्याची गरज नाही पडणार. कारण आता ग्राहकांना त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन EMI भरता येणार आहे. एचडीएफसी बँक आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने देशामध्ये त्यांच्या बिझनेस करस्पाँडंट्ससाठी ईएमआय कलेक्शन सर्व्हिसेस लाँच केले आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर तुमचा कर्जाचा हप्ता जमा करण्यासाठी तुम्हाला व्हिलेज लेव्हल एंटरप्रेन्योर (VLE) ला त्यांची काही माहिती द्यावी लागेल, ज्याचे व्हेरिफिकेशन करता येईल. यामध्ये ग्राहकांचा कर्ज क्रमांक, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक, पॅन, जन्मतारीख इ. माहिती VLE कडे कर्जदारांना द्यावी लागेल. यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत फोन नंबरशी व्हीएलई कर्ज खाते लिंक करून सिस्टमवर देय रक्कम तपासता येईल. यानंतर, बँक व्हीएलईकडून जमा केलेल्या रकमेची पावती ग्राहकांना दिली जाईल. त्यानंतर तो ही रक्कम बँकेत जमा करेल.
यामुळे लोकांना त्यांच्या जवळच्या जवळ ग्रामीण आणि दुर्गम भागात आर्थिक सेवांचा विकास होईल. सीएससीच्या माध्यमातून कलेक्शन फॅसिलिटी सुरू झाल्यानंतर ग्राहकांना बँक शाखेमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. तर एचडीएफसी बँकेने या अभियानाअंतर्गत सीएससी आणि एचडीएफसी बँक कर्जाचा नियमित ईएमआय गोळा करण्यासाठी बिझनेस करस्पाँडंट्सकडून देण्यात येणाऱ्या सेवांचा वापर करतील. एचडीएफसी बँक आणि सीएससीच्या या करारामुळे दुर्गम भागातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. जवळपास 1 लाख व्हीएलईच्या माध्यमातून बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांचा लाभ या भागातील नागरिकांना घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘समान गुण असूनही प्रवेश मिळण्यास अडचण’, साष्टपिंपळगावच्या विद्यार्थ्यांची खंत
- ‘महाराष्ट्र देशा’ थेट साष्टपिंपळगावात, मराठा आरक्षण आंदोलनाच्या ठिणगीचे मशालीत रुपांतर
- खळबळजनक! खा.जलील 100 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आणणार
- मुंबईकरांवर लोकल प्रवासासाठी वेळेचं बंधन; मनसेची खोचक टीका
- धनश्री काडगावकरच्या घरी चिमुकल्याचे आगमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

