नांदेड : जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या ‘मुलीचे नाव घराची शान’ उपक्रमाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष कौतुक केले. यावेळी जिल्ह्यात खालावलेला मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियानाचा प्रारंभ यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. औरंगाबाद शहरात विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात राज्यास्तरीय प्रारुप आराखडा बैठक आयोजीत करण्यात आली होती.
नांदेड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ८८८ इतके आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाकडून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोक चव्हाण आणि इतर मान्यवराच्या हस्ते या उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्ह्यातील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनातर्फे यासाठी विविध प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेतले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांना ‘मुलीचे नाव घराची शान’ या उपक्रमाअंतर्गत घरावर लावण्यासाठी मुलींच्या नावाची पाटी देण्यात आली. तसेच जनजागृतीसाठी शाळा, गर्दीच्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आणि नांदेड जिल्ह्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गच्या टूलकिटचे बीड कनेक्शन, अटक टाळण्यासाठी शंतनू मुळूक हायकोर्टात
- मिथुन चक्रवर्ती असणार प.बंगालमध्ये भाजपचा चेहरा ?
- आता ‘डू नॉट डिस्टर्ब’ ऍक्टिवेट असताना ग्राहकांना कॉल आल्यास ‘टेलिमार्केटर्स’कडून आकारला जाणार दंड !
- भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील, वडेट्टीवारांनी डागली तोफ
- ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठं पाऊल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
