Share

आता ‘डू नॉट डिस्टर्ब’ ऍक्टिवेट असताना ग्राहकांना कॉल आल्यास ‘टेलिमार्केटर्स’कडून आकारला जाणार दंड !

Published On: 

नवी दिल्ली: जाहिरातींच्या काळामध्ये असे एक ही मध्यम जाहिराती विना सोडले जात नाही. यामध्ये मोबाइल धारक ग्राहकांना तर टेलिमार्केटर्स कडून नेहमीच कॉल, मेसेज करून त्रास दिला जातो. त्यामुळे अनेक ग्राहक कंपन्यांच्या या त्रासाला कंटाळून डू नॉट डिस्टर्ब या सेवेअंतर्गत या कॉल, मेसेज पासून मुक्तता मिळवतात मात्र तरी देखील अनेकदा ग्राहकांना लिमार्केटर्स’कडून हे कॉल, मेसेज येत राहतात यासाठी आता दूरसंचार विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावेत यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी दूरसंचार ग्राहकांना विनाकारण फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्ती किंवा टेलिमार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

डू नॉट डिस्टर्ब नोंदणीकृत ग्राहकांना SMS किंवा कॉल करणाऱ्या टेलिमार्केटर किंवा संबंधित टेलिकॉम कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचा निर्णय या बैठकीमध्ये केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतला आहे. नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेले नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी आणि कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा असे निर्देश प्रसाद यांनी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!