Share

परभणीत भव्य क्रीडांगणासाठी कृषी विद्यापीठात मिळणार जागा, कृषी मंत्र्यांची मंजुरी

Published On: 

परभणी : परभणी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे यासाठी खासदार संजय जाधव हे प्रयत्नशील होते. परंतु जागेचा प्रश्न उद्भवत होता. त्यासाठी कृषी विद्यापीठातील जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली होती. कृषी मंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे, यासाठी खासदार संजय जाधव हे प्रयत्नशील होते. परंतु जागेचा प्रश्न उद्भवत होता. त्यासाठी कृषी विद्यापीठातील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली होती. या संदर्भात मुंबईत कृषी मंत्री भुसे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या वेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहुल पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत खासदार संजय जाधव यांनी क्रीडा संकुलाचा प्रश्न मांडला, त्यावर विद्यापीठातील एकूण दहा एक्कर जागा देण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यांनी तत्वतः मंजुरी दिली.

या या बैठकीस राज्याचे कृषी सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, कुलसचिव यांच्यासह इतर अधिकारी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!