Share

चेन्नईविरुद्ध विजयानंतर मुंबई इंडियन्सने ‘महाराष्ट्र दिनाच्या’ पार्श्वभूमिवर केले खास ट्विट

Published On: 

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

हा सामना १ मे रोजी होता. आणि १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला महाराष्ट्रा राज्याचा संघ म्हणून बघितले जाते. याच दिवशी विजय प्राप्त झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हॅंडलने ‘महाराष्ट्र दिनाच्या’ पार्श्वभूमिवर खास ट्विट केले. या ट्विट मध्ये ‘महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राची टीम विजयी.’ असे ट्विट केले. या ट्विटवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव झाला.

या सामन्याआधी चेन्नईचा संघ सलग पाच सामने जिंकत आला होता. त्यामुळे सामन्याच्या दिवशी सकाळपासूनच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईचा संघ चेन्नईला रोखणार आणि महाराष्ट्र दिनी विजयाची पताका फडकवणार अशी चर्चा सोशल मीडीयावर दिवसभर सुरु होती. मात्र चेन्नईने २१९ धावांचे लक्ष्य बघुन मुंबईचे समर्थक चिंतेत पडले होते. मात्र पोलार्डने धमाकेदार कामगीरी करत मुंबईला विजय मिळवुन दिला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!