औरंगाबाद : केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या किमतीत झालेली घसरण केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे झाली, अशी टीका आ. सतीश चव्हाण यांनी केली.
आ. चव्हाण यांनी फेसबुक पेजवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने १२ लाख टन जीएम (जेनेटिकल मॉडिफाइड) सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिली. त्यामुळे सोयाबीनच्या किमती ११ हजारांवरून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्या आहेत.
https://www.facebook.com/mlcsatishchavan/posts/402085981276553
महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांवर अवलंबून आहेत. नवीन सोयाबीन बाजारात येण्याच्या काळातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीचा निर्णय घेतला. तसेच सोयाबीन पेंडवरील आयात कर कमी करून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे आ. चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- “अहो आरोग्यमंत्री साहेब, वसुलीचा आकडा ठरलं नसल्यामुळे ही परीक्षा रद्द झाली का?”
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- नगरचा डंका देशभरात गाजला; यूपीएससी परीक्षेत चार मुलं यशस्वी
- काँग्रेसला देशात पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येतील – बाळासाहेब थोरात


