🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावर निशाणा साधला आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) कर्णधारपदावरून हटवण्याच्या मुद्द्यावर गांगुलीने वादग्रस्त वक्तव्य करण्याची गरज नसल्याचे मांजरेकर याने स्पष्टपणे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने अचानक विराट कोहलीच्या हातून वनडे संघाचे कर्णधारपद हिसकावून घेतले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला आहे. कोहली आणि बीसीसीआय (BCC) यांच्यातील संबंध काही ठीक नसल्याचे दिसून आले.
संजय मांजरेकर म्हणाले, “मला माहित नाही की सार्वजनिक संभाषण का व्हायला हवे होते. किंवा बीसीसीआयच्या अध्यक्षांनी कोणतेही विधान का केले पाहिजे होते, प्रत्यक्षात ते निवड समितीच्या अध्यक्षांचे काम आहे. भारतीय क्रिकेट प्रशासनात निवड समितीचा अध्यक्ष खूप महत्त्वाचा असतो, पण त्याला जे महत्त्व द्यायला हवे होते ते मिळत नाही. रिकी पाँटिंगचे उदाहरण देताना मांजरेकर म्हणाला की, जेव्हा त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हा निवडकर्त्यांनी सर्व काही स्पष्ट केले होते.
मांजरेकरांपूर्वी माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही गांगुलीने राष्ट्रीय निवड समितीच्या वतीने कर्णधारपदाच्या मुद्द्यावर बोलायला नको होते, असे म्हटले होते. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी निवड किंवा कर्णधारपदावर बोलायला हवे होते. कर्णधार निवडायचा की काढून टाकायचा हा निर्णय निवड समितीचा असतो. ते गांगुलीच्या अखत्यारीत येत नाही.
T20 विश्वचषक 2021 सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने T20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याला एकदिवसीय आणि कसोटी संघांचे कर्णधार राहायचे होते. मात्र टी-20 विश्वचषकात भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर अचानक कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. सौरव गांगुलीने नंतर खुलासा केला की त्याने कोहलीला T20 कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती.
मात्र, विराट कोहलीने गांगुलीच्या दाव्याचे खंडन करत म्हटले की, त्याला कर्णधारपद सोडू नये अशी कोणतीही विनंती केली नव्हती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची निवड होण्याच्या दीड तास आधी त्याला कर्णधारपदावरून हटवल्याची माहिती मिळाली. कोहली-गांगुली यांच्या स्वतंत्र दाव्यांवर मांजरेकर म्हणाले, “हा सामना सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली ऐवजी कोहली विरुद्ध चेतन शर्मा (मुख्य निवडकर्ता) व्हायला हवा होता.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकार दोन पाऊल पुढं आलं असतं तर तोडगा निघाला असता’
- “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करुन महाराष्ट्राला ‘नाईट क्लब’ बनवायचं का”
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
