नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA )यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुपरस्पोर्ट पार्क सेंच्युरियन येथे खेळला गेला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने सामना जिंकला. सेंच्युरियन येथे भारताचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला १९७ धावा करता आल्या. भारताने दुसऱ्या डावात 174 धावा केल्या. दुसऱ्या डावात केवळ 197 धावा करता आल्या आणि भारताने पहिली कसोटी 113 धावांनी जिंकली.
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यातच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. दादांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “टीम इंडियाचा शानदार विजय.. निकालाने अजिबात आश्चर्य वाटले नाही. या मालिकेत भारताला पराभूत करणे कठीण होईल. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पूर्ण ताकदीनिशी खेळावे लागेल.”
Great victory for Team India ..not surprised by the result at all…will be a hard team to beat this series..South africa will have to play out of their skins to do that ..enjoy the new year @bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) December 30, 2021
टीम इंडियाचे अभिनंदन करताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, “आधी ब्रिस्बेन, ओव्हल, लॉर्ड्स आणि आता सेंच्युरियन…. विराट कोहली, राहुल द्रविड आणि टीम इंडियाचे विजयासाठी खूप खूप अभिनंदन.”
Wohoo Brisbane, Oval, Lord’s and now Centurion…Congratulations @imVkohli, Rahul Dravid and the entire contingent on becoming the first Asian nation to win at Centurion #BoxingDayTest #TeamIndia pic.twitter.com/k9zTHE1nWQ
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) December 30, 2021
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे आणि म्हटले आहे की, “2021 कसोटी क्रिकेट टीम इंडियासाठी स्वप्नासारखे होते. गब्बा, लॉर्ड्स, ओव्हल, सेंच्युरियन आणि सिडनी येथील ड्रॉची अप्रतिम लढाई कोण विसरू शकेल. 2022 साठी खूप खूप शुभेच्छा.”
Dream 2021 for Team India in Test Cricket. Gabba, Lord’s , Oval, Centurion and who can forget the amazing fight to draw at Sydney. Wishing a happy and even better 2022 for #TeamIndia pic.twitter.com/pLhTVJWOvz
— Virender Sehwag (@virendersehwag) December 30, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

