नवी दिल्ली : चीन आणि नेपाळ यांच्यात वाढत्या सीमा विवादांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर मोठा हल्लाबोल केला आहे. एक दिवस असा येईल, जेव्हा पीओकेचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात जायचं आहे, असं विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केलं आहे.
#WATCH Just wait, soon people of Pakistan occupied Kashmir (PoK) will demand that they want to be with India & not under the rule of Pakistan, and the day this happens, a goal of our Parliament will also be accomplished: Defence Mini Rajnath Singh at 'Jammu Jan Samvad rally' pic.twitter.com/kQUtV2CanP
— ANI (@ANI) June 14, 2020
पाकिस्तानने अवैध ताबा मिळवलेल्या पाकव्याप्त कश्मीरमध्ये भारताची ताकद वाढत आहे. पाकड्यांच्या दहशतवादी कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घालले होते. त्यानंतर हवाई दलाने एअर स्ट्राईक करून पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तसेच आता हवामान खात्याने गिलगिट आणि मुफ्फराबादची हवामानाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतात सहभागी होण्याची मागणी लवकरच पाकव्याप्त कश्मीरमधूनच होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. जम्मू जनसंवाद कार्यक्रमात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जम्मू- काश्मीरचा भाग येत्या काही वर्षात बदलेल. जम्मू- काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. तसेच येत्या काही दिवसात काश्मीरला चांगल्या उंचीवर घेऊन जायचे आहे, असे राजनाथ सिंह म्हटले.
राज्यपालांची हकालपट्टी करा, पंतप्रधान मोदींकडे करणार मागणी
‘शेतकऱ्यांनी धीर धरावा, नुकसानीच्या मदतीचे निकष बदलून अधिक भरपाई देऊ’
दिशाच्या शुभेच्छांच्या स्पेशल ट्वीटला आदित्य ठाकरेंनी केला ‘हा’ रिप्लाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

