Share

‘शेतकऱ्यांनी धीर धरावा, नुकसानीच्या मदतीचे निकष बदलून अधिक भरपाई देऊ’

Published On: 

रायगड – राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलं असताना कोकणाला निसर्ग चक्रीवादळाने अक्षरशः झोडपून काढाल आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्याने कोकणात मोठे नुकसान झाले आहे. हर्णै, मुरुड, केळशी, आंजर्ला, वेळास, कोळथरे या भागांमध्ये चक्रीवादळाने अवघ्या काही तासांत इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. स्वत:च्या हिमतीवर जगणारे आणि सरकारी अर्थसंकल्पावर अवलंबून न राहता निसर्गाच्या कृपेवर हक्काचे दोन घास मिळवणारे कोकणवासी त्यामुळे मेटाकुटीस आले आहेत.

या पार्श्वभूमीवर काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील कोकण दौरा केला. राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र कोकणातील परिस्थितीचा विचार करता ती गुंठ्याच्या हिशेबाने कशी देता येईल, याबाबत सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करणार आहे. त्यामुळे मदतीपासून कोणीच वंचित राहणार नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

नुकसानग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासाठी शासन कटिबद्ध आहे. देण्यात येणाऱ्या नुकसानीच्या मदतीचे निकष बदलून दुपटीहून अधिक करण्यात आले आहेत. पूर्ण घराचे नुकसान झाले असेल तर दीड लाख रुपये आणि अंशत: झाले असेल तर पंधरा हजारांच्या आसपास मदत देण्यात येणार आहे. बागायतदारांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. नागांवनंतर थोरात चौल, मुरुड तालुक्यातील काशिद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मुरुड येथे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून श्रीवर्धनमधील दिघी बंदर, म्हसळ्यातील तुरुंबडी येथे नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.

आनंदाची बातमी : राज्यभरात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले

आतापर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना ३३२ कोटी रुपयांचे वाटप

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – बाळासाहेब थोरात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!