Share

दिशाच्या शुभेच्छांच्या स्पेशल ट्वीटला आदित्य ठाकरेंनी केला ‘हा’ रिप्लाय

Published On: 

मुंबई- काल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. १३ जून १९९० रोजी जन्म झालेले आदित्य ठाकरे यांनी काल आपला ३०वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांची मैत्रीण व अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ आदित्य ठाकरे यांचे नाव दिशासोबत जोडले गेले आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असे ट्वीट तिने केले आहे.

विशेष बाब म्हणजे काल दिशा चा देखील वाढदिवस होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी काल दिशाला रिप्लाय केला आहे.धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी 13 जून रोजी वाढदिवसानिमित्त ‘तुलासुद्धा शुभेच्छा’ म्हणजे ‘सेम टू यू’ असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर’, म्हणत आदित्य ठाकरेंनी तिला शुभेच्छा दिल्या. तसंच तिने दिलेल्या शुभेच्छांचा देखील स्विकार केला.

मागच्या वर्षी एका डिनर डेटनंतर दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांना एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर या दोघांच्या नावाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर एका मुलखातीत दिशानं आदित्य ठाकरे यांच्या कामाचं कौतुकही केलं होतं आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाही शुभेच्छा दिल्या होत्या.

‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबती लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

“आदित्य ठाकरेंना खुश ठेवण्यातच अजित पवारांसह सर्वांच भलं”

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची हवा; टिक-टॉकवर गाठला १ कोटी ७७ लाखांचा टप्पा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!