मुंबई : धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात पोहोचल्या आहेत. त्या यथे एसीपी ज्योत्स्ना रासम यांच्यासमोर आपला जबाब नोंदवत आहेत. दरम्यान रेणू शर्मा यांचा यापूर्वीसुद्धा जाबाब नोंदवला गेला होता. मात्र, जबाब अपूर्ण राहिल्याने आज शर्मा यांना पुन्हा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, ‘धनंजय मुंडे यांनी मला भेटून या प्रकरणातील त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी आरोपांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्यावरील आरोपांचं स्वरूप हे गंभीर आहे. यावर आम्हाला पक्ष म्हणून निर्णय करावा लागेल. पक्षातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन याविषयी निर्णय केला जाईल. मुंडेंनी मला सखोल माहिती दिली असून इतर सहकाऱ्यांना ती सांगून त्यांचे मत घेणं हे माझं कर्तव्य आहे.’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी ७९ टक्के मतदान
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- शिक्षणाचा रोड मॅप तयार करा,शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
- महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा होणार संपूर्ण कायापालट

