Share

ऑक्सिजन टँकचा निधी कागदावरच पडून

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मेल्ट्रोन कोवीड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँक उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीने ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तसे पत्रही महापालिकेला महिनाभरापूर्वी दिले आहे. त्यानुसार ऑक्सिजन टँकच्या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रियाही राबवली, मात्र अद्याप निधीच प्राप्त झाला नसल्याने एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांना मेल्ट्रॉन रुग्णालयात उपचार देता यावेत, यासाठी पालिकेने इथे २० केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्याचा निर्णय तीन महिन्यांपूर्वी घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवली. मात्र, त्यासाठी निधी नसल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे ८ कोटी रुपयांची मागणी केली होती.

जिल्हा नियोजन समितीतून या कामासाठी पालिकेला ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र पालिकेला पाठवले. मात्र अद्याप जिल्हा प्रशासनाकडून निधी मिळालेला नाही. त्यामुळे ऑक्सिजन टँक उभारणीच्या कामाचे कार्यारंभ आदेश एजन्सीला देण्यात आलेले नाही. निधी प्राप्त होताच कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरूवात केली जाईल.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!