Share

लातूर : खाजगी कोचिंग क्लासेस अटींच्या अधिन राहून सुरु करण्यास परवानगी

Published On: 

लातूर :- जिल्हयात कोवीड-19 च्या प्रादुर्भाव कमी करण्याच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्या नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्हयातील खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये Doubt session (इयत्ता 9 वी पासून पूढील वर्ग ) पूढील अटींच्या अधीन राहून मर्यादित स्वरुपात सुरु करण्याची परवानगी देत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये Doubt session आयोजित करताना शासन परिपत्रकान्वये शाळा सुक्षितपणे सुरु करण्यासाठी निर्गमित करण्यता आलेल्या मार्गदर्शक सुचना / निकषांचे व कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सबब परवानगी फक्त Doubt session साठीच लागू राहील. कोणत्याही सबबीवर नियमीत क्लासेस आयोजित करता येणार नाहीत.

नियमित क्लासेस ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करुनच घेण्यात यावेत.कोचिंग क्लास/ रेमेडीयल क्लास च्या ठिकाणी बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distance) चे नियम पालन करुन आयोजित करावे. कोचिंग क्लासेसचे शिक्षक, स्टाफ, विद्यार्थ्यांचेसाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य असेल, विना मास्क प्रवेश देण्यात येऊ नये. नियमित निर्जतुकीकरण (Frequent Sanitization) वैयक्तिक स्वच्छता (Self hygiene) व्हँटीलेशन, स्वच्छतेसाठी प्रवेशव्दारावर Hand wash / alcholol based sanitizers ची व्यवस्था ई. व्यवस्थेबाबत कटाक्षाने लक्ष दयावे.Doubt session मध्ये शारीरिक अंतर (Physical Distance) चे नियम पालन करुन एका वेळी जास्तीत जास्त 25 विद्यार्थ्यांच्या कमाल मर्यादेत वर्ग आयेाजित करावे. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे वर्ग आयोजित करण्यात येऊ नयेत.

प्रत्येक Doubt session 45 ते 60 मिनिटांच्या वेळ मर्यादेत आयोजित करावे. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा वर्गाची वेळ कालावधी (Duration of each doubt session) वाढणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची संमती (Parents Consent) घेऊनच कोचिंग क्लासमध्ये Doubt session साठी बसण्याची परवानगी देण्यात यावी. कोवीड-19 सदृश्य (सर्दी,खोकला,ताप ई.) असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येऊ नये. त्यांची आवश्यक तपासणी करुन उपचार घेण्याबाबत समुपदेशन करण्यात यावे.

या आदेशाचे किंवा आदेशातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास सदरील आदेश रद्द करण्यात येऊन संबंधित विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्अ्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 ई.मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही आदेशात नमुद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!