🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांनी भाजपला एक ऑफर दिली आहे. यामुळे एका वेगळ्याच राजकीय चर्चांना उधान आले आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्यावी’, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले यांनी दिलेला सल्ला शक्य होऊ शकतो. पण उत्तरप्रदेश ते शक्य होऊ शकते. जर रामदास आठवले यांनी मध्यस्ती केली तर ते उत्तर प्रदेशात शक्य होऊ शकते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे लोकसेवा करेल. असा विश्वासही रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
हो हे शक्य होऊ शकत ! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मध्यस्ती केली तर
.
.
.
.
पण ते उत्तरप्रदेश मध्ये …महाराष्ट्रात #MVA सक्षमपणे 25 वर्ष लोकसेवा करेल pic.twitter.com/8haZptsBNU
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 11, 2022
नाशिक येथे रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युती करावी,असे ते म्हणाले आहेत. ‘निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. पण निकालानंतर आकडे आले तेव्हा आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे लक्षात आल्यावर सेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला भाजपने फेटाळला, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- विधानसभा निवडणुकींचे निर्बंध लागू होण्यापूर्वीच भाजपने घेतल्या ३९९ प्रचार सभा
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
