Share

सोनू सूद घरगुती तक्रारीचे सुद्धा करतोय निवारण; पाहा नेमकं प्रकरण

Published On: 

मुंबई : अभिनेता सोनू सूद कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील अनेक कोरोनाग्रस्त आणि गरजवंत लोकांना मदत आजही अहोरात्र मदत करत आहे. अनेकजण त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. अनेकांच्या मदतीला सोनू धावून येतो. नुकतेच एका महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन सोनू सूदकडे पोहोचली.

https://www.instagram.com/reel/CShW7S3Kuc6/?utm_source=ig_web_copy_link

सोनू सूदकडे एक महिला तिच्या खाजगी आयुष्यात सुरू असलेली समस्या दूर करण्यसाठी घेऊन आली. यावेळी सोनू सूदने महिलेची समस्या समजून घेत महिलेच्या पतीला व्हिडीओ कॉल केला आणि त्याला म्हणाला की, मला गॅरंटी द्या की तुम्ही मुलीची काळजी घ्याल आणि मग मी तुमच्या मुलीसोबत तुम्हाला भेटणार असल्याचे देखील यावेळी सोनुने सांगितले. सोनुचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकानी त्याचे कौतुक केले आहे.

कोरोना काळात अनेक गरजूंना मदत पोहोचवण्याचे काम सोनू निःस्वार्थी भावनेने करत आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीने राजकारणात यावे अशी इच्छा अनेक सेलेब्रीटींनी तसेच सामान्य माणसांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. परंतु यावर त्याने आपला असा कोणताही ही विचार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!