🕒 1 min read
मुंबई : कोरोनाची वैश्विक महामारी सुरु होताच लॉकडाऊनच्या कारणास्तव स्थलांतरित कामगारांना मदत करून चर्चेत आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या आठवड्यापासून इतर कारणांमुळे चर्चेत आहे. याचे कारण आयकर विभागाने गेल्या तीन दिवसांपासून सोनू सूदच्या मुंबई येथील निवासस्थानी तपास केला.
आयकर विभागाच्या मते, सोनूच्या स्वयंसेवी संस्थेने 2.1 कोटी रुपये परदेशातून क्राऊड फंडींगच्या माध्यमातून जमवले आहेत. हे परदेशी योगदान (विनिमय) कायद्याचा उल्लंघन आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर टॅक्स चोरी करण्यात आल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत,सोनू सूदने आपलं अघोषित उत्पन्न बनावट स्त्रोतांमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाच्या स्वरुपात दाखवलं होतं, असं आयकर विभागाने म्हटलं.
तर या छापेमारीबाबत आता सोनू सूदने मौन सोडले आहे. सोनू सूदने एक पोस्ट केली आहे, त्यात तो म्हणाला कि, ‘मी देशातील जनतेला सर्व प्रामाणिकपणे मदत करत आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी माझा फाउंडेशन नेहमीच तयार असते. मी गेल्या चार दिवसांपासून काही पाहुण्यांच्या सेवेत व्यस्त होतो, म्हणून तुम्हा लोकांना मी मदत करू शकलो नाही. पण लवकरच मी तुमच्या सेवेत हजर असेल.’ असे मत त्याने मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी मुंबई सज्ज; आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात होणार प्रत्यक्ष महत्वाची बैठक; व्हाईट हाऊसने दिली माहिती
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचची प्रवेश प्रक्रिया होणार सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
