मुंबई : भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाली. स्पर्धा रद्द होताच विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहे. यादरम्यान केकेआर संघाचा सदस्य असलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
९ एप्रिलला जेव्हा जगभरात मदर्स डे साजरा होत होता त्यावेळी पॅट कमिन्सची भावी पत्नी बेकी बॉस्टन हीने ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. कोलकाता नाइट रायडर्स संघाने ट्विट करत ही आनंदाची बातमी केकेआरच्या चाहत्यासोबत शेअर केली . या ट्विटमध्ये ‘मदर्स डेच्या दिवशीच किती गोड बातमी’ असे लिहीले होते. लवकरच कमिन्सच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होईल. कमिन्सनं या आनंदामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला एक अत्यंत खास गिफ्ट दिलं आहे.
पॅट कमिन्सनं सिडनीमध्ये एक अलिशान व्हिला खरेदी केला आहे. आता लवकरच कमिन्स आणि बॅकी या घरामध्ये राहतील. या घराची किंमत 9.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 70 कोटी रुपये आहे. याची माहिती प्रसीद्ध वृत्त पात्रांनी दिली आहे. ‘पॅटनं मला हा व्हिला गिफ्ट दिला आहे’, अशी माहिती बॅकीनं सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये, अशोक चव्हाण यांचा घणाघात
- मोठी बातमी : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
- …तर ‘त्या’ सेलिब्रिटींनी समोर येऊन सांगावं दबाव टाकला जातोय; शिवसेनेचं प्रत्युत्तर !
- गडकरींनी शब्द पाळला; वर्ध्यात निर्मित झालेल्या रेमडेसिवीरचा पहिला स्टॉक बाहेर !
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आवडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

