मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे कंत्राटी मुख्यमंत्री होते, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. म्हणून मुख्यमंत्री पदावरुन त्यांना पायऊतार व्हावं लागलं, असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या शिवनिष्ठा यात्रेवर देखील त्यांनी ताशेरे ओढले आहेत.
नारायण राणे म्हणाले, “हे कंत्राटी सरकार नाहीत तर पर्मनंट सरकार आहे. गणरायाने येण्यापूर्वी हाकलवून लावले. उद्धव ठाकरेंनी अपमानास्पद खाली उतरल्यानंतर गप्प घरात बसायला पाहीजे. दुसरं ट्विव ट्विव करत एक उंदीर (आदित्य ठाकरे) महाराष्ट्रभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने फिरत आहे. राज्यावर जे संकट होते ते संकट दुर करुन गणरायाचे आगमन झाले आहे.”
टक्केवारीने मुंबईच शोषण केलं-
“ज्यांच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता आहे. त्यांनी ही मुंबई घडवली नाही. त्यांनी बकाल मुंबई बनवली. त्यांनी टक्केवारीने मुंबईच शोषण केलं. त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होईल, आणि भाजपच्या ताब्यात येईल”, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
खरे गद्दार उद्धव ठाकरेच-
भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काल देखील टीका केली आहे. शिंदे गटात गेलेले आमदार गद्दार नसून खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत ठाकरे मुख्यमंत्री झाले, असेही राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले, असा घणाघात बावनकुळेंनी केला.
मुख्यमंत्री पद हे गद्दारी करुन मिळवलं-
नारायण राणे म्हणाले, आमदारांशी आणि पक्षाशी खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री पद हे गद्दारी करुन मिळवलं. भाजपशी गद्दारी केली. कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांशी गद्दारी केली. आमदारांना कोणत्याही प्रकारे मदत, सहकार्य आणि भेटी दिल्या नाहीत. उद्धव ठाकरेंनी जी कामे केली ती त्यांचे नातेवाईक आणि मोतोश्रीसाठी केली. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Narayan Rane | उद्धव ठाकरे हे कंत्राटी मुख्यमंत्री होते ; नारायण राणेंचा घणाघात
- Amol Mitakari | “शिंदे गटातील अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात” ; अमोल मिटकरींचे विधान
- BDD चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
- AKOLA | बाप्पाचं आज आमदार अमोल मिटकरींच्या घरी आगमन
- Pushpa Ganpati | गणेशजींवर पुष्पराजचा फिवर, पुष्पा स्टाईलमध्ये बाप्पाचे दर्शन झाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

