🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या नविन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘हाकामारी’ असे असुन हा सस्पेन्स थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक समिर विद्वांस करणार आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे
या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची कथा ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली आहे. गुप्ते यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. या चित्रपटाच्या नावातले वेगळेपण प्रेक्षकांना खेचुन आणेल असा विश्वास त्यांना वाटत आहे.
दिग्दर्शक समीर विध्वांस यांनी २०१३ मध्ये ‘टाईम प्लिज’ या सिनेमाने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत धुराळा, आनंदी गोपाळ, डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा प्लॅनेट मराठीचा पहिला वेब सिनेमा आहे. सोनाली कुलकर्णी आणि समिर विद्वांस पुन्हा एकत्र येत असल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्णाण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला ‘तो’ सुवर्णहार CID कडून जप्त
- कृषी विकास योजनेअंतर्गत ८१ शेतकर्यांना मिळणार सिंचन विहिरी
- मोठी बातमी : सचिन वाझेंकडून एनआयए ने केल्या महत्वाच्या गोष्टी जप्त !
- कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला आता धर्मगुरुंची मदत
- एमपीएससी परीक्षेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून नियमावली जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
