औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना व्यापक प्रमाणात यशस्वी करत जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तरी सर्व धर्मगुरूंनी आपल्या स्तरावर नागरीकांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगत कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने विविध धर्मांच्या धर्मगुरूंसोबत मंगळवारी (१६) आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जिल्ह्यातील संसर्गाबाबतची सविस्तर माहिती देऊन जिल्हाधिकारी यांनी लसीकरण मोहीमेबद्दलही यावेळी माहिती दिली. सध्या ज्येष्ठ नागरीक आणि 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्यांना लस देण्यात येत असून त्याबाबतही धर्मगुरूंनी जनतेमधील शंका दूर करत त्यांना लसीकरणाची सुरक्षीतता आणि फायदे समजावून सांगत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
अफझल शहा यांनी समाज माध्यमांवर कोरोना नसल्याबाबतचे अनेक चुकीचे व्हिडीओ प्रसारीत होत असतात. त्यावर प्रशासनाने प्रतिबंध आणावा, असे सूचित करून मशिदींमध्ये प्रार्थनेच्या वेळी समुदायांना कोविड नियमावलीचे पालन करण्यासाठी आवर्जून सांगण्यात येईल याबाबत आश्वासित केले. तेथील लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास लोक अधिक प्रमाणात नियमांचे पालन करतील असे सूचित केले. तसेच भदंत सुदत्त बोधी यांनी मोकळ्या मैदानांमध्ये रात्रीच्या वेळी क्रिकेट वा तत्सम खेळ खेळणारास प्रतिबंध करणे उचित ठरेल असे सांगितले.
पार्श्वनाथ जैन मंदीरचे महाविर ठोले व एकनाथ मंदिरचे एस.के. शेलार यांच्यासह उपस्थितांनी मंदिरांमधुन मोठ्या प्रमाणात कोविड नियमावलीचे पालन करण्यात येत असून प्रशासनाच्या निर्देशानुसार विविध धार्मिक उत्सव, पुजाविधीचे कार्यक्रम स्थगीत करण्यात आले आहे. तसेच मंदीर, गुरूव्दारा, महानुभवाश्रम या ठिकाणी येणाऱ्या भावीकांकडून कोविड नियमावलीचे पालन करून घेण्यात येत असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आंधळं दळतंय..! मनपा पथकाची दादागिरी, परवानगी असलेल्या प्लास्टिकलाही लावला दंड
- परभणीतून रेल्वेद्वारे अडीच हजार टन सोयाबीन गुजराथला रवाना
- धक्कादायक! काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून पुतणीचा विनयभंग
- कॉंग्रेसला सोडचिठी देत ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
- जिल्हाधिकारी चव्हाण यांचा ग्रामीण भागातही दणका


