🕒 1 min read
पुणे : समृद्ध जीवन घोटाळा भ्रष्टाचाराच्या दुनियेत खूपचं गाजलेलं प्रकरण आहे. या घोटाळ्यात समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजना आणून देशातील सामान्य लोकांपासून ऐशो आरामात जगणाऱ्या बड्या श्रीमंत लोकांनाही अमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती.
यामुळे २०१४-१५ हे वर्ष चांगलचं गाजलं होतं. समृद्ध जीवन कंपनीने देशभरातील लाखो गुंतवणुकदारांना तब्बल २५१२ कोटी रुपयांचा गंडा घातला होता. यामुळे २०१५ साली महेश मोतेवार यांना पोलिसांनी अटक केली होती.
आतापर्यंत भारतात अट्टल गुन्हेगारांनी सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या विविध योजना आणून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. समृद्ध जीवन कंपनीनेही देशातील अनेकांना लवकरात लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांना लुटलं होतं.
या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार याने या फसवणुकीच्या पैशातून २०१३ साली पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल दीड किलो सोन्याचा हार अर्पण केला होता. या प्रकरणाचा छडा CID तपासात लागला आहे. हा हार सीआयडीने पुन्हा ताब्यात घेतला आहे. या सोन्याच्या हाराची किंमत जवळपास ६० लाखांच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.
सीआयडी अधिकारी मनिषा पाटील यांनी सांगितलं की, ‘मोतेवार यांनी गंडा घातलेल्या पैशांचा वापर कुठे केला, याची माहिती शोधत असताना आम्हाला या हाराविषयी माहिती मिळाली. देशभरातील लाखो लोकांची फसवणूक केलेल्या पैशातुनच हा हार घेतल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर आम्ही दगडूशेठ ट्रस्टशी बोलून हा हार परत घेतला आहे.’ या हाराचं सध्याचं बाजारमूल्य जवळपास ६० लाख ५० हजार रुपयांच्या घरात आहेत. या हाराबाबतीत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृषी विकास योजनेअंतर्गत ८१ शेतकर्यांना मिळणार सिंचन विहिरी
- परभणीतून रेल्वेद्वारे अडीच हजार टन सोयाबीन गुजराथला रवाना
- धक्कादायक! काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून पुतणीचा विनयभंग
- कॉंग्रेसला सोडचिठी देत ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
- जिल्हाधिकारी चव्हाण यांचा ग्रामीण भागातही दणका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
