🕒 1 min read
मुंबई : मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
दरम्यान, एनआयएने सचिन वांझेची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ते सहकार्य करत नसल्याची तक्रार एनआयएने मुंबई स्तर न्यायालयात केली आहे. दरम्यान, एनआयए ने सचिन वाझेंडकुन महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत.
काल उशिरा रात्री मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत CIU (क्राईम इंटेलिजन्स युनिट) विभागाची झाडाझडती घेऊन सचिन वाझे यांचा कॉम्प्युटर, मोबाईल आणि महत्वाचे कागदपत्रे हस्तगत केली आहेत. . त्यामुळे सचिन वाझेंबाबत मोठे खुलासे होऊ शकतात. यातून काही महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागणार का ? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. दरम्यान, सचिन वाझेंना केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टानं अशत: मान्य केली आहे. चौकशीच्यावेळी वकिलांनासोबत राहण्याची मुभा एनआयए कोर्टाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गुजरातच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतलाय – नाना पटोले
- राणेंची अवस्था पाण्यातून काढलेल्या माश्यासारखी; जयंत पाटलांचा घणाघात
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- शरद पवारांच्या भेटीमध्ये फक्त हवा-पाण्याच्या गप्पा झाल्या – संजय राऊत
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
