Share

सोनाक्षीने पोस्ट शेअर करत दिले लग्नाचे संकेत ; चाहते झाले अवाक्

Published On: 

मुंबई : अभिनेते शत्रुघ्न सिन्हा ( Actor Shatrughan Sinha ) यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Actress Sonakshi Sinha) गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल (Actor Zaheer Iqbal) यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट लिहिली असून त्यामध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याला पुष्टी दिल्याचे समजते. तसेच पोस्टद्वारे तिने लग्नाचे संकेत दिल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान सोनाक्षी सलमान खानच्या (Salman Khan) कुटुंबातील तसेच ‘नोटबुक’ ‘Notebook’ चित्रपटातील अभिनेता जहीर इकबालला डेट करत असून तिने जहीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने जहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जहीरचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिने त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘जगातील सर्वात जास्त त्रास देणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जगातील सर्वात चांगला व्यक्ती आहेस. तू असा का आहेस? वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले.

https://www.instagram.com/p/CXTPWT5IIo_/?utm_source=ig_web_copy_link

सोनाक्षीच्या या पोस्टवर चाहत्यांनी तसेच तिच्या मित्रमैत्रीणींनी देखील कमेंट केल्या आहेत. जहीरने केलेल्या कमेंटनेसर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘पण ती माझी खास मैत्रीण आहे. बरोबर..’ या आशयाची कमेंट करत त्याने हसण्याचे इमोजी वापरले आहेत. पुढे त्याने आणखी एक कमेंट करत ‘आता मी अधिकृतरित्या तुला माझी हिरोइन म्हणू शकतो’ असे म्हटले आहे. त्यामुळे सोनाक्षी जहीरला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले असून  चाहत्यांना याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!