औरंगाबाद : देऊळगाव राजा ते चिकलठाणा प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची एक लाख रुपये असलेली बॅग बसमधून लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. बसस्थानकातील चोरीच्या लुटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या रहिवाशाने बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेबाबत हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. मात्र अजूनही महामंडळ प्रशासनाला जाग आलेली नाही.
लोणार तालुक्यातील प्रल्हाद नन्हेरे हे औरंगाबाद येथे उपचार घेण्यासाठी १० ऑगस्ट रोजी डॉक्टरांकडे येत होते. सोबत त्यांनी एक लाख रुपये घेतले होते. डोक्याचा वर जाळीमध्ये त्यांनी १ लाख रुपये ठेवले होते. चिकलठाणा येथे आल्यानंतर त्यांना बॅग गायब झाल्याचे आढळून आले. त्यांना धक्काच बसला प्रवासी व कंडक्टरला विचारणा केली. मात्र कोणीही माहिती नसल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसात बसस्थानकातून व्यापारी, वृद्ध यांच्यावर नजर ठेवली जात आहे.
बस स्थानकात चोरी करणारी ही टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे बोलले जाते. बस स्थानकावर बसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांची नजर चुकवून ही टोळी पैशांची बॅग तसेच पैसे काढून घेत आहे. मात्र बस स्थानक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील बस स्थानकांमध्ये सुविधांचा अभाव आहेच. त्यासोबतच सुरक्षेचाही मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. बस स्थानकांमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल औरंगाबादचे रहिवासी मुकेश भट यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका देखील दाखल केली आहे.
बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेसह विविध सुविधांबद्दल या याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले आहे. भट्ट यांनी याचिका दाखल करताना औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून काही महिन्यांपूर्वी एका खाजगी एजंटने पाचशे रुपयासाठी एखाद्या विद्यार्थ्याचे अपहरण करून खून केल्याचा संदर्भ दिला आहे. महामंडळाच्या बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी यासाठी विभागीय नियंत्रकांकडे अर्ज केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सीईटी रद्द ; अकरावी प्रवेशासाठी औरंगाबादेतील महाविद्यालय गजबजले!
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- ‘अभाविप’ ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनोखे उपक्रम राबविणार
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट


