नांदेड : शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना देगलूर बिलोली जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. त्यांनी आज भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण शिवसेना सोडतोय, असं म्हणत साबणेंनी चव्हणांवर आरोप केला. त्यांच्या आरोपाला अशोक चव्हाणांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
साबणे मुळातच शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मग त्यांचा आणि माझा काय संबंध?, असा सवाल करत साबणे यांनी शिवसेनेच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी. निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपल्या आपली भूमिका मांडली तर बरं होईल. पक्ष सोडून जाणारा काहीतरी बोलूनच जातो, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी साबणेंना टोला लगावला आहे.
माझ्या सारखी परिस्थिती अनेकांची आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावं. आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे. मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेस ला मतदान मागितलं असतं आणि मग 2024 ला कुणासाठी मतदान मागितलं असतं, असं साबणे म्हणाले.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


