Share

….तर भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन न केलेले बरे: पॅट कमिन्स

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे स्थगित करावी लागली. यानंतर भारतात आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच परिस्थीतीवर बोलताना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स म्हणाला की,’टी-२० विश्वचषक स्पर्धेमुळे जर भारतातील साधन संपत्तीवर ताण येत असेल तर भारतात ही स्पर्धा आयोजीत न केलेलीच बरी’ असे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की,’भारतातील सुविधा पुरेशा आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी कमीन्स असेही म्हणाला की,’मात्र आत्ता या विषयावर बोलणे खुप घाईचे ठरेल, कारण विश्वचषकाला ६ महिन्याचा कालावधी आहे.’ असे म्हणाला. तसेच आयसीसीने स्पर्धेच्या आयोजनाबाबत आधी भारत सरकारशी चर्चा करुन निर्णय घ्यावा असा सल्लाही कमिन्सने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!