Share

मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करत आलिया भट्टने मेन्टल हेल्थ सेंटरची दिली माहिती

Published On: 

मुंबई : देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ संकट निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मृत्यू होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. यामुळे अनेकजण चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत काही जणांना मानसिक आधाराची गरज आहे. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने कोरोना काळात लोकांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करण्यासाठी मानसिक उपचार करणाऱ्या मेन्टल हेल्थ सेंटरची माहिती तिच्या सोशल अकाऊंटवरून शेअर केली आहे. यापूर्वी बॉलिवूडची ‘मस्तानी’ अभिनेत्री दीपिका पादूकोण हिने देखील अशी माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केली होती.

कोरोनाच्या या परिस्थितीमुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक काम बंद आहेत. यामुळे सर्वच जण आपापल्या घरातच अडकले आहेत. अशा स्थितिमध्ये लोकांना कामाचा तणाव, घरातील वाद, नोकरी गमावणे असे अनेक चिंतेचे विषय निर्माण झाले आहेत. यामुळे बर्‍याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टने पुढाकार घेतला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये मेन्टल हेल्थ सेंटरचं नाव, संपर्क क्रमांक, वेबसाईट, पत्ता अशी सगळी माहिती देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/COj3y4csRB7/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून मेन्टल हेल्थ हेल्पलाइन नंबर शेअर तिनं लिहिलं की, ” सध्या काळ खूप कठिण सुरू आहे. तुम्ही कितीही मजबूत नसला तरीही तुम्ही अनेकांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करू शकता. हे काही मेन्टल हेल्थ सेंटर्सचे हेल्पलाइन नंबर आहेत, इथे मानसिक उपचार आणि मार्गदर्शन केलं जातं.” तसंच पोस्टच्या शेवटी तिने हे नंबर जपून ठेवा आणि गरज असणाऱ्यांपर्यंत ही पोस्ट शेअर करा, असं आवाहन देखील केल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!