Share

अभिनेत्री कंगनाला कोरोनाची लागण ; सोशल मिडियावरून स्वतः दिली माहिती

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

कंगणा राणावत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत म्हणाली. मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे, मला काही कल्पनाच नाही आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल, असंही कंगणा म्हणाली.

https://www.instagram.com/p/COmVsjTBQ9e/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी कंगना तसेच अनेकदा तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींच्या निकालावर देखील कंगना रनौत ट्विटरवर वाद निर्माण होईल असे बोलली त्यामुळे ट्विटरने तिचे अकाऊंट सस्पेंड केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!