Share

कॉंग्रेसमधून आऊटगोइंग सुरूच आणखी एका बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

Published On: 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच काहींनी भाजप तर काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षबदलामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नगरसेवक, मोठे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला.

फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.सुजय, रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव भाजपबरोबर जोडलं जाईल.

कोण आहेत रणजितिसंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह ना. निंबाळकर हे माजी खासदार हिंदुराव ना. निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. स्वराज उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. 1996 साली रणजितसिंहांचे वडील हिंदूराव ना. निंबाळकर यांनी शिवसेना – भाजप युतीकडून लोकसभा निवडणूक लढवतसातारा लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी देखील त्यांची ओळख आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!