Share

‘काही लोकांना अधूनमधून विनोद करायची फारच हुक्की येते’, भुजबळांचा प्रसाद लाड यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: भाजपचे प्रसाद लाड यांना अधूनमधून विनोद करण्याची सवय आहे, असा मिश्कील टोला राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू, या विधानामुळे प्रसाद लाड चर्चेत आहेत. या वक्तव्याला सेनेने सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तर हसूच सुटले.

दरम्यान नाशिक येथे प्रसार माध्यमाशी बोलतांना छगन भुजबळ यांनी या मुद्यावर भाष्य केले. अगोदर तर त्यांनी कोण लाड? असा विरोधी मिश्कील सवाल माध्यमांना केला. त्यानंतर त्यांनी ‘काही लोकांना अधूनमधून विनोद करण्याची सवय असल्याचे’ म्हटले. त्यामुळे अशा निरर्थक गोष्टींवर लक्ष देऊ नये अशा हेतूने त्यांनी प्रसाद लाड यांच्यावर निशाना साधला.

दरम्यान प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा सेना-भाजप मध्ये राजकीय वाद  होण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरून सेना आक्रमक झाली असून सेनेच्या अनेक नेत्यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!