मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघादरम्यान मानाची समजली जाणारी अॅशेज ही मालिका येत्या डिसेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपुर्वी काही दिवसापुर्वी इंग्लंडचा अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्सने स्पर्धेतून माघार घेतली. यादरम्यान या मालिकेपुर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे.
गेल्या दिड दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा या बायोबबलच्या नियमाअंतर्गत खेळविण्यात येतात. याच नियमामुळे इंग्लंड संघातील खेळाडू आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलियातील बायोबबलच्या नियमानुसार दौऱ्यावर कुटुंबाला सोबत नेण्याची परवानगी नाही. यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबाला सोबत घेऊन जाण्याची परावनगी नाही दिली तर इंग्लंडचे क्रिकेटपटू या दौऱ्यावर बहिष्कार टाकु शकतात.
यावेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंडच्या दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाचे उदाहरण दिले आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला कुटुंबासोबत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर या नियमात बदल नाही झाला तर ५० वर्षानंतर इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबाशिवाय जाईल. यापुर्वी १९६० साली असा प्रकार घडला होता. टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर इंग्लंडचा संघ थेट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीर प्रीमीयर लीग स्पर्धेवरून बीसीसीआयकडून पाकिस्तानला रोखठोक उत्तर
- सायकल वर स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रशासकांनी नगरसेवकांना सोबत घेऊन पाहणी करावी – नासीर सिद्धिकी
- चिंता वाढली : शाळा सुरु करताच ६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
- ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा

