मुंबई : काश्मीर प्रीमीयर लीग स्पर्धेचे आयोजन करुन पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्नात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गीब्सने बीसीसीआय या स्पर्धेत न खेळण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावर बीसीसीआयने हर्शेल गीब्स आणि पाकिस्तान दोघांना सडेतोड उत्तर दिले आहे.
याप्रकरणी बीसीसीआयने हर्शेल गीब्सच्या आरोपाचे खंडण करताना बीसीसीआय म्हणाली, ‘ज्या खेळाडूची मॅच फिक्सींग प्रकरणात सीबीआयकडून चौकशी झाली आहे. अशा खेळाडूंच्या आरोपात किती तथ्य आहे हे कुणीच सांगु शकत नाही. आणि जरी हे आरोप खरे असतील तरी. काश्मीर हा भारताचा भुभाग आहे. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्याचा बीसीसीआयला संपुर्ण अधिकार आहे. ही गोष्ट पाकिस्तानने लक्षात घ्यावी असे’ बीसीसीआयकडून सांगण्यात आले.
यावेळी बीसीसीआयने असेही म्हणले आहे की,’पाकिस्तानला हा मुद्दा जर आयसीसीकडे घेऊन जायचा असेल तर ते खुशाल घेऊन जाऊ शकतात. कारण भारतात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धाबाबत निर्णय घेण्याचा संपुर्ण हक्क हा बीसीसीआयचा आहे. महत्वाची बाब म्हणजे अशा गोष्टी करण्यासाठी त्यांना कोण प्रोत्साहन देतं हे सगळ्यांना माहित आहेच.’ असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- सायकल वर स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रशासकांनी नगरसेवकांना सोबत घेऊन पाहणी करावी – नासीर सिद्धिकी
- चिंता वाढली : शाळा सुरु करताच ६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
- ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा
- भगत सिंह नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना मुलाला लागला गळफास

