मुंबई : काश्मीर प्रीमीयर लीग स्पर्धेचे आयोजन करुन पाकिस्तान सरकारने पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्नात नाक खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गीब्सने बीसीसीआय या स्पर्धेत न खेळण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता.
यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद अफ्रिदीने उडी घेत बीसीसीआयवर निशाना साधला आहे. हर्शल गीब्सने केलेले ट्विट शेअर करत शाहिद आफ्रिदीने,’बीसीसीआयकडून पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारण एकत्र करणे हे खुपच निराशाजणक आहे. काश्मीर प्रीमीयर लीग ही स्पर्धा काश्मीर, पाकिस्तान आणि जगभरातील क्रिकेट रसीकांसाठी आहे. आम्ही एक उत्कृष्ट खेळ सादर करु. अशा वागण्याने आम्हाला काही फरक पडत नाही.’ असे लिहीले आहे.
Really disappointing that BCCI is once again mixing cricket and politics! KPL is a league for Kashmir, Pakistan and cricket fans around the world. We will put up a wonderful show and won't be deterred with such behaviour!! https://t.co/J9XcbEeUF6
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) July 31, 2021
या प्रकरणावर बीसीसीआयने म्हणले आहे की,’पाकिस्तानला हा मुद्दा जर आयसीसीकडे घेऊन जायचा असेल तर ते खुशाल घेऊन जाऊ शकतात. कारण भारतात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धाबाबत निर्णय घेण्याचा संपुर्ण हक्क हा बीसीसीआयचा आहे. महत्वाची बाब म्हणजे अशा गोष्टी करण्यासाठी त्यांना कोण प्रोत्साहन देतं हे सगळ्यांना माहित आहेच.’ असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. आता आफ्रिदीला प्रत्युत्तर देण्यास कोणता भारतीय खेळाडू समोर येतो याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुरुषाच्या चुकीसाठी स्त्रीला दोष देणे थांबवा’ ; शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ पुढे आली रीचा चढ्ढा
- पाकिस्तानी फलंदाजाने केला ‘हा’ विश्वविक्रम ; जगातील सर्व फलंदाज टाकले मागे
- यामुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू टाकू शकतात ऍशेज मालिकेवर बहिष्कार
- काश्मीर प्रीमीयर लीग स्पर्धेवरून बीसीसीआयकडून पाकिस्तानला रोखठोक उत्तर
- सायकल वर स्टंटबाजी करण्यापेक्षा प्रशासकांनी नगरसेवकांना सोबत घेऊन पाहणी करावी – नासीर सिद्धिकी

