Share

मरकजमधील कार्यक्रमाला सांगली-वाशीम मधील काहीजण झाले होते सहभागी

Published On: 

वाशीम : निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले.

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संचारबंदी लागू असतानाही धार्मिक कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी साथीचा आजार कायदा आणि भारतीय दंडविधाननुसार मौलाना साद आणि इतर तबलीघी जमात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील 3 जण गेल्याची माहिती समोर येत आहे. 3 जणांना तातडीने क्वॉरन्टाईन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान,दिल्लीतील हजरत निजामुद्दिन येथे तब्लीगी जमातसाठी गेलेल्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र त्या व्यक्तीने स्वतः तपासणी करून क्वॉरन्टाईन करून घेतलं असून इतर लोकांची सदर प्रकरणी माहिती घेणं सुरू आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!