Share

कोरोना हरतोय : देशात आजच्या दिवशी कोरोनाचे सर्वात कमी मृत्यू

Published On: 

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोनाने भारतातही कहर माजवला होता. जगात सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या काही देशात भारताचा समावेश होता. संपूर्ण जगासह भारतीयांसाठी मागील अकरा महिन्यांपासून कोरोना जीवघेणा ठरला. मात्र, भारताने कोरोना प्रतिबंधित लस निर्माण केल्याने कोरोना मृत्यूंचे थैमान कमी झाले आहे.

भारतात कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध झाली असली तरी कोरोना संक्रमण पूर्णपणे थांबलेले नाही. परंतु, कोरोना संक्रमानाबाबत एक दिलासादायक बातमी समोर आलीये. भारतात आज रविवारी १ मेपासून आजवरच्या सर्वात नीचांकी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज दिवसभरात २४ तासात भारतात फक्त ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरु असताना ही दिलासादायक बातमी समोर आल्याने, कोरोनाच्या संकटातून देश सावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाच्या केसेसची संख्या आता १.०८ कोटी इतकी झाली आहे. काल शनिवारी देशभरातून समोर आलेल्या १२०५९ केसेसची यात भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील सक्रिय केसेसची संख्या आता १.४८ लाख इतकी आहे. हे एकूण केसेसच्या १.३७ टक्के आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार आजवर कोरोनामुळं झालेल्या मृत्यूची संख्या १.५ लाख इतकी आहे.

‘भारत सध्या आणखी सात लसी विकसित करतो आहे. याशिवाय प्रत्येक भारतीयाला लस उपलब्ध व्हावी यासाठीची यंत्रणाही विकसित केली जाते आहे. आपण केवळ दोन लसींवर अवलंबून नाही. देश अजून सात लसींवर काम करतो आहे. पुढेही अजून लसींवर काम केलं जाणार आहे. कारण भारत हा अतिशय प्रचंड देश आहे. आपल्याला अजून संशोधनाची गरज लागणार आहे’, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!