Share

नगरमधील भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात- संग्राम जगताप

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- भाजपमधून राष्ट्रवादीत जात स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी मिळविणारे मनोज कोतकर हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे शिवसेना नेत्यांनी मान्य करत स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोज कोतकर यांची काल बिनविरोध निवड झाली. अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तर येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण पाहायला मिळेल याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. तसेच काल झालेल्या स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असेही आ.संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

अहमदनगरमध्ये स्थायी समिती सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे समितीच्या सभापतीपदी कोतकर यांची बिनविरोध निवड झाली होती. मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत आणून आ.संग्राम जगताप यांनी भाजपला धक्का दिला होता परंतु आज भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचे सांगत आ.जगताप यांनी भाजपला आणखी चिंतेत टाकले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!