मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. त्यांची धमकी पोकळ आहे. मीच अधिवेशनात भाजप नेत्यांची पोलखोल करणार आहे. त्यावेळी भाजप नेते तोंड लपवून फिरतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलाताना किरीट सोमय्यांवर तसेच भाजपवर निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भांडाफोड करणार आहे की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल. पिक्चर सुरू आहे. इंटरव्हल झाला आहे, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
तुमच्याकडे इतका मोठा पसारा आहे. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय आहे. सर्व काही आहे. तुम्ही सात वर्ष नवाब मलिकांबाबत खोदत आहात. अजून खोदा. पण मी काही केलंच नाही. तुम्ही करणार काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे, असंही मलिक म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार; किरीट सोमय्यांची महाविकास आघाडीला इशारा
- राज्यात वीजटंचाई होणार नाही, वेळ पडली तर सेंट्रल ग्रील्डमधून वीज देणार; रावसाहेब दानवेंचा विश्वास
- माचीसची काडी महागली! दिवाळी आली, महागाईचे काय करणार?; राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल
- ‘प्रकाश आंबेडकरांची कोणीतरी दिशाभूल केल्याने त्यांनीच युती तोडली’, असदुद्दीन ओवेसींचे स्पष्टीकरण
- ‘एमआयएम महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढणार’, असदुद्दीन ओवेसींची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

