कराड – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपनेते किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.या सर्व प्रकरणावर केंद्रही लक्ष ठेवून आहे. किरीट सोमय्या प्रकरणावर केंद्राचं बारीक लक्ष आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांनी भाजप नेत्यांकडून सोमय्या प्रकरणाची माहिती घेतली.
आजही त्यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आप्पासाहेब नलावडे यांच्याकडे सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा नवा आरोप सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. तसंच पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, कारखाना २०२० मध्ये पारदर्शकपणाशिवाय एका कंपनीला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. यातील ९८ टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात २ टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या नातलगांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली. ती का दिली ते शरद पवारांना माहिती आहे. मतिन हे हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

