Share

IPL 2022 : हार्दिक जैसा कोई हार्डिच नहीं है..! सनरायझर्सविरुद्ध ठोकलं खास शतक; रचला ‘वेगवान’ विक्रम!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) इतिहास रचला आहे. या टी-२० लीगमध्ये हार्दिकने आपले १०० षटकार पूर्ण केले आहेत. भारतीय म्हणून हार्दिकने सर्वात वेगवान षटकारांचे शतक पूर्ण केले आहे. पंड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली.

गुजरात टायटन्सच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी एडन मार्कराम आला. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिकने मार्करामला षटकार ठोकला. आयपीएलमध्ये १०० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पांड्या एकूण २६ वा खेळाडू ठरला आहे. सर्वात कमी चेंडूत शतक पूर्ण करणारा हार्दिक पहिला भारतीय ठरला आहे. त्याने १०४६ चेंडूत ही कामगिरी केली आहे.

यापूर्वी हा विक्रम भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने १२२४ चेंडूंत शतकी षटकार ठोकला होता, तर भारतीयांमध्ये युसूफ पठाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. पठाणने १३१३ चेंडूत षटकारांचे शतक पूर्ण केले होते. आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० षटकार ठोकण्याचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर आहे. रसेलने ६५७ चेंडूत हा पराक्रम केला. या यादीत ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे तर हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!