Share

‘माझ्या मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न सोडविणे, माझे पहिले कर्तव्य’, आ. संजय शिरसाठ यांचे प्रतिपादन!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘माझ्या मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न सोडविणे, मी माझे पहिले कर्तव्य समजतो. आज येथील नागरिक-महिला-युवक यांच्या पाठिंब्यामुळेच मी या भागाचे प्रतिनिधित्व तसेच विकास कामे करु शकलो. सातारा-देवळाई या भागातील नागरिकांना याआधी खूप त्रास सहन करावा लागला. मात्र आता हळूहळू रस्ते, ड्रेनेज लाईन होत आहे यापुढे येथील नागरिकांना कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही. याची मी जातीने काळजी घेईल’. अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी दिली.

आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातील सातारा-देवळाई या परिसरात विकास कामे जोमाने सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने बीड बायपास रोड याठिकाणी ३८३ कोटींचा मोठा पूल, पाण्याची पाईप लाईन, सातारा-देवळाईतील असलेले अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन ही सर्व कामे सुरू आहेत. यामध्ये काही कामे पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले ही करण्यात आले आहेत.

काही कामे प्रगतीपथावर असताना रविवारी (दि.२९) सातारा गावाअंर्तगत, द्वारकानगरी, देवळाई-सातारा अंतर्गत हनुमान मंदिर पासून ते क्रीडा संकुलकडे जाणारा सिमेंट रस्ता, वेणूसुत हाऊसिंग सोसायटी येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, या भागात रस्ते नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हत्या, पण आता या भागात रस्ते, ड्रेनेज लाईनचे काम झाले. त्याच बरोबर पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होत आहे. आज जे कामे या भागात मी करत आहे ते कामे नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून ही सर्व विकास कामे होत आहेत. असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!