कन्नड : प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शाळा, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी समितीने समस्यांचा पाढाच वाचाला, प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. परंतु शिक्षण मंत्र्यांनीहि लक्ष घालण्याचे समितीने सांगितले.
जुनी पेन्शन योजना, शिक्षण सेवकांना २५ हजार रुपये मानधन, वैद्यकीय प्रतीपुर्तीसाठी कॅशलेस योजना लागू करणे, समग्र शिक्षा अभियान-मोफत गणवेश योजना भेदभाव न करता सर्व विद्याथ्र्यांना राबविणेबाबत, बीपीएल कुटुंबातील मागासवर्गीय मुलींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ करणे, ग्रामीण भागातील कर्मचा-यांनी मुख्यालयी राहण्याचे दृष्टीने आवश्यक त्या सुचना अव्यावहारीक परिपत्रक रद्द करणे, ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत संगणक अहर्ता धारण मुदतवाढ मिळणे व अतिप्रदान वसुली रद्द करणे बाबत, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निरसनासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा होण्यास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींना वेळ मिळवून देणे.
अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, कार्याध्यक्ष के.के.जंगले, जिल्हा प्रसिध्दिप्रमुख सतीश कोळी, मच्छिंद्र निमोणे, अतूल गायके, वासुदेव कोळी, वैशाली हिवर्डे आदींनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

