🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यात आणि केंद्रात शिवसेना–भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील अंतर वाढले आहे. असे असले तरी वैयक्तिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक वर्ष सोबत काम केल्यानेही दोन्ही पक्षातील नेत्यांना एकमेकांचे खाचखळगे माहिती आहे. औरंगाबादचे राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांना अर्थराज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा आमदार अंबादास दानवे यांनी देखील डॉ. कराड यांच्याकडे अशीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यसभा खासदार भागवत कराड यांची अर्थ राज्यमंत्री पदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात पक्षीय मतभेद विसरून आपण संभाजीनगर सह मराठवाड्यातील केंद्रिय स्तरावरील प्रश्न सोडवत विकासासाठी प्रयत्नशील असाल हि अपेक्षा!’
औरंगाबाद महानगर पालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी आजपर्यंत सोबतच काम केले आहे. त्यात डॉ. भागवत कराड हे महापौर राहिलेले आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत या दोन्ही पक्षांना स्वतंत्र लढावे लागले तर कराड विरुद्ध दानवे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण मनपात पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची धुरा या दोघांच्याच खांद्यावर राहील.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून शुभमन बाहेर पडल्यास KKR संघाकडे सलामीसाठी असतील हे दोन पर्याय
- ऐसी भी क्या नाराजगी? मुंडे भगिनींकडून नुतन मंत्र्यांचे साधे अभिनंदनही नाही!
- नसीरुद्दीन शाहंना रुग्णालयातून डिस्चार्ज; फोटो शेअर करत दिली माहिती
- नारायण राणेंना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी – संजय राऊत
- राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश म्हणजे युती होणार नाही यावर शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
