🕒 1 min read
दुबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु आसलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला. यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित केली. काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या उर्वरीत सामन्याची घोषणा केली.
येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केकेआर संघाचा महत्वाचा खेळाडू आणि सलामीवीर शुभमन गील दुखापतीमुळे स्पर्धेतुन बाहेर झाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर आसलेल्या शुभमन गीलला झालेली दुखापत ही गंभीर असुन आयपीएल स्पर्धेपुर्वी तो फीट होण्याची शक्यता कमी आहे.
गिल वेळेत फिट होऊ शकला नाही कोलकता नाईट रायडर्स संघात सलामी फलंदाज म्हणून हे २ फलंदाज त्याची जागा घेऊ शकतात. राहुल त्रिपाठी 2017 राइजिंग पुणे सुपरजायंटसाठी सलामीला येत राहुल त्रिपाठीने आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. गिल उपलब्ध नसल्यास त्याची निवड होऊ शकते.
टिम सेफर्ट केकेआर लाइन-अपमधील आणखी एक नियमित सलामीवीर टिम सेफर्ट अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करू शकलेला नाही. गिल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध नसल्यास केकेआर सेफर्ट एक प्रबळ दावेदार असेल.
महत्वाच्या बातम्या
- आजारी असतानाही एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीसाठी हजर
- “दिलीप कुमार यांच्या घरी जायला वेळ आहे, पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटायला नाही”
- अमित शाहांकडे सहकार खाते गेल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- ‘कोण कुणाला अंगावर घेतं ते बघाच’, राणेंना मंत्रिपद मिळाल्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया
- श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिक करतोय गोलंदाजीचा सराव, पण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
