मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह मागील काही दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असल्याचे समोर आले होते. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नसिरुद्दीन यांचा मुलगा विवान शाह याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली.
पहिली पोस्ट शेअर करताना विवानने “बॅक टू होम” लिहिले आहे, तर दुसर्या फोटोमध्ये लिहिले आहे की, “त्यांना आजच सकाळीच डिस्चार्ज मिळाला आहे”. अभिनेत्याचे हे दोन्ही फोटो त्याच्या बेडरूममधील असल्याचे दिसत आहे.

नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक-शाह यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या फुफ्फुसात न्युमोनियाचा एक छोटासा पॅच आढळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार केल्याने त्यांचा न्यूमोनिया नियंत्रणात आणला गेला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
नसीरुद्दीन शाह हे ७० वर्षांचे आहेत. त्यांनी १९७५ साली निशांत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर शेवटचे ते राम प्रसाद की तेरहवी या चित्रपटात झळकले होते. त्यांनी अनेक चित्रपटात उत्तम काम करत स्वतः ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. तसेच अभिनेता होण्याव्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह एक दिग्दर्शक देखील आहेत. त्यांनी ‘यूं क्या होता है’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

