टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोलो (Solo) ट्रीपचा ट्रेंड खूप वाढला आहे. जो बघा तो आजकाल सोलो ट्रीपला निघतो. विशेषतः मुलींमध्ये सोलो ट्रिपचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे लोक सोलो ट्रॅव्हल कडे आकर्षित होताना दिसत आहे. पण बराच वेळा अनेक जण भीतीपोटी सोलो ट्रिपचे प्लॅन सोडून देतात. पण सोलो ट्रॅव्हलिंग हे खूप सुरक्षित असून त्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव मिळतात. त्यामुळे सोलो ट्रिप ला जाण्याचा विचार हा नेहमी चांगलाच असतो. तुम्ही जर सोलो ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल पण त्याचवेळी सुरक्षिततेची काळजी तुम्हाला तुमच्या विचार रद्द करण्यास भाग पाडत असेल तर तो विचार सोडून बातमी वाचायला घ्या, कारण या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही देशाबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे सोलो ट्रिप करणे एकदम सुरक्षित आहे.
सोलो (Solo) ट्रिपसाठी सुरक्षित ठिकाणं
आइसलँड
आइसलँड हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक देश आहे. आइसलँड या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी आहे. त्याचबरोबर आइसलँड मधील आरोग्य क्षेत्र खूप विकसित आहे. त्याचबरोबर इथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. हा देश एक सुरक्षित देश असून इथे तुम्ही आरामात सोलो ट्रिप करू शकता.
कॅनडा
कॅनडा हे एक जगातील सर्वात प्रेक्षणीय ठिकाण आहे. कॅनडा मधील बर्फवृष्टी येथील मुख्य आकर्षण आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॅनडामध्ये पर्वत,तलाव, सुंदर जंगल बघायला मिळतील. कॅनडा हा सोलो ट्रिपसाठी एकदम सुरक्षित देश आहे. तुम्ही येथे निवांत सोलो ट्रीपचा आनंद घेऊ शकता.
न्युझीलंड
एका अहवालानुसार, न्युझीलंड हा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जगातील दुसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे. सोलो ट्रिपसाठी न्युझीलंड हे कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही. दरवर्षी लाखो लोक येथे फिरायला जातात. या देशामध्ये पर्यटकांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात.
स्वित्झर्लंड
जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात सुरक्षित देश म्हणून ओळखला जाणारा स्वित्झर्लंड देश पर्यटकांची पहिली पसंती असते. स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही कोणत्याही भीती शिवाय फिरू शकता.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया हे सोलो ट्रीप साठी सर्वोत्तम ठिकाण आहे. विशेषतः महिलांसाठी ऑस्ट्रेलिया खूप सुरक्षित मानले जाते. हा देश जगातील थंड देशांपैकी एक देश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही रात्री देखील निवांत फिरू शकता.
महत्वाच्या बातम्या
- Rutuja Latake । “मला कोर्टात जायची वेळ येऊ द्यायची नव्हती”; न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया
- Rutuja Latke | ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
- Chitra Wagh । चित्रा वाघ यांनी आयुक्तांवरील दबावाचे आरोप फेटाळले, ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड उत्तर
- “शेवटच्या मिनिटापर्यंत…” ; ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया!
- Gopichand Padalkar | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम रखडले, पडळकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

