सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये केलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये 80 टक्के अँटीबॉडीज तयार झाल्याचं दिसून आलं आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण केलं जात आहे. सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद किती प्रमाणात आहे, त्यांच्यात सामूहिक प्रतिकारकशक्ती किती टक्के आहे, याची पडताळणी सेरो सर्वेक्षणातून केली जात आहे.
सेरो सर्वेक्षणात रक्त नमुन्यांची चाचणी करून प्रतिपिंडे (करोनाच्या अॅण्टीबॉडीज् ) शोधली जातात. या सर्वेक्षणासाठी10 वर्षांवरील विविध वयोगटातील आणि परिसरातील एक हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले असून, त्यापैकी आठशे नमुन्यांची पडताळणी झाली आहे. त्यामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीणचाही समावेश असून शहरातील एक हजार तर ग्रामीणमधील एक हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत.
दरम्यान, मुंबईत नुकत्याच करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात सुमारे 86.64 शतांश टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकार शक्ती विकसित झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र विषाणूचा नवीन प्रकार आल्यास या रोगाची लागण होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा बृह्न्मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नसलेल्या 79 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये देखील प्रतिकार शक्ती निर्माण झाली असल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.
मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले, तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्यात आले. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८,६७४ नागरिकांमध्ये पूर्वसंमतीने पाचवे सेरो सर्वेक्षण करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- अनंत गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही; पवारांवरील टीकेमुळे संजय राऊत व्यथित ?
- मराठवाडा चिंब; पुन्हा सर्वदूर पडलेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कर्मवीर अण्णांचं योगदान मोलाचे आहे – अजित पवार


