Share

अनंत गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही; पवारांवरील टीकेमुळे संजय राऊत व्यथित ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

अनंत गीते म्हणाले की, दुसरा कोणताही नेता, त्याला जगानं कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. महाविकास आघाडी ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आता गितेंच्या वक्तव्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वक्तव्यं कुणी करत असेल तर आम्ही दखल घेत नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनीच सुचवलं होतं. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. बाळासाहेब आणि पवार सुद्धा एकत्रित व्यासपीठावर यायचे हे सांगतानाच संजय राऊत यांनी गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही असंही म्हटलं आहे.

अशा प्रकारची वक्तव्यं पक्षशिस्तीत बसत नाहीत. ही पक्षाची अधिकृत भूमिका अजिबात नाही. त्यांच्या भावना असतील, पण महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्याविषयी असं बोलणं चुकीचं. कारवाई काय करायची ते उद्धव ठाकरे ठरवतील. असं म्हणत संजय राऊत यांनी गितेंच्या विधानावर थेट निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!