Share

मराठवाडा चिंब; पुन्हा सर्वदूर पडलेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब

Published On: 

औरंगाबाद : सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्यावर मान्सून मेहरबान झाला आहे. यामुळे काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी मराठवाड्यातील जवळपास सर्वच धरणे १०० टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

गेल्या ४७ तासांचा विचार केल्यास जालना जिल्ह्यातील १५ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती. बीड जिल्ह्यातील पाटोदा, बीड, केज यासह माजलगाव परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. बीड, लातूर आणि उस्मानाबादची तहान भागवणारे मांजरा धरण भरल्याने यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मराठवाड्यात आणखी एक आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अतिपाऊस झाल्याने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्या नंतर परतीचा मान्सून दाखल झाल्यानेही ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत विभागात पावसाची शक्यता कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!